अजित आगरकरची नियुक्ती
। मुंबई । वृत्तसंस्था ।
आयपीएल मेगा ऑक्शननंतर सर्व टीमची नव्याने रचना झाली आहे. नवे खेळाडू टीममध्ये दाखल झाल्यानंतर आता कोचिंग स्टाफमध्येही बदल होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा असिस्टंट कोच म्हणून मुंबई आणि टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकरची नियुक्ती झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंग या टीमचा हेड कोच आहे. प्रवीण आम्रे बॅटींग कोच आणि जेम्स होप्स बॉलिंग कोच आहेत.
आगरकरची कोच म्हणून नियुक्ती झाल्याने टीम इंडियाचे माजी खेळाडू मोहम्मद कैफ आणि अजय रात्रा यांचा दिल्लीसोबतच्या कराराला मुदतवाढ मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. हे दोघेही टीमचे असिस्टंट कोच होते. कैफ 2019 पासून टीमसोबत होता. तर रात्राची मागील वर्षी नियुक्ती करण्यात आली होती. 44 वर्षांचा अजित आगरकर पहिल्यांदाच एखाद्या टीमचा कोच झाला आहे. तो 2007 साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने 2013 साली क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आगरकरनं निवृत्तीपूर्वी वन-डे क्रिकेटमध्ये 288 तर टेस्टमध्ये 58 विकेट्स मिळवल्या आहेत. मुंबईच्या अनेक रणजी विजेतेपदामध्येही आगरकरचा मोठा वाटा होता.
दिल्ली कॅपिटल्सला मिळाला नवा कोच
