आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान शास्त्रींचा मोठा दावा
। मुंबई । वृत्तसंस्था ।
टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये परतले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते कॉमेंटेटर होते. 2016 साली टीम इंडियाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर त्यांनी कॉमेंट्री करणे सोडले होते. शास्त्री हे नेहमीच त्याच्या सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही आयपीएल ऑक्शनमध्ये असता? तर किती रक्कम मिळाली असती? असा प्रश्न शास्त्री यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी त्याचे रोखठोक उत्तर दिले.
शास्त्री यांनी आपल्याला आरामात 15 कोटी मिळाले असते, तसेच मी आयपीएल टीमचा कॅप्टन झालो असतो यामध्ये कोणतीही शंका नाही, असा दावा केला आहे. शास्त्री यांनी दावा केलेली रक्कम सध्याच्या सिझनमध्ये महेंद्रसिंह धोनीला मिळणार्या रकमेपेक्षा जास्त आहे. चेन्नई सुपर किंग्सचा माजी कॅप्टन असलेल्या धोनीला यंदा 12 कोटी रूपये देऊन सीएसकेने रिटेन केले आहे.
टीम इंडियाने 1983 साली जिंकलेल्या वर्ल्ड कप टीमचे शास्त्री सदस्य होते. डाव्या हाताने ऑफ स्पिन बॉलिंग आणि उजव्या हाताने बॅटींग करणार्या शास्त्री यांनी 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये टीम इंडियासाठी अनेक उपयुक्त खेळी केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स लगावण्याचा रेकॉर्डही त्यांच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 1985 साली झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांना मप्लेयर ऑफ दी सीरिजफ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.