। चिपळूण । प्रतिनिधी ।
डेरवण येथे संपन्न झालेल्या या राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेत 14 वर्षा खालील मुले या वयोगटात न्यू हिंद विजय क्रिडा मंडळ संघ उपविजेता ठरले. या मुलांचे अभिनंदन न्यू हिंद विजय क्रिडा मंडळाचे अध्यक्ष मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे उपाध्यक्ष राजेश शिंदे, सेक्रेटरी मिलिंद पवार, खजिनदार योगेश हुंबरे, सदस्य नथुराम गुढेकर, सभासद संतोष पाटील व मंडळाचे हितचिंतक रवि घोसाळकर, उल्हास भोसले यांनी केले.
सदर राज्य स्तरीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईचा पुरस्कार न्यु हिंद विजय क्रिडा मंडळाच्या सार्थक भोसले याला मिळाला आहे. या सर्व खेळाडूंना विनायक पवार, मंगेश पवार, राजेश शिंदे व योगेश हुंबरे यांनी यांचे मार्गदर्शन लाभले.