। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा येथील कोकण उन्नती मित्र मंडळाच्या वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालयाच्या 1990-91 पासूनच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवार 9 एप्रिल रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. 1992-93 पासून महाविद्यालयातून बी.ए,बी.कॉम. झालेल्या आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी तसेच 2018-19 पासून बी. एससी, एम. कॉम. झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित राहावे. असे आवाहन महाविद्यालय विकास समितीचे सचिव प्रतिनिधी फजल हळदे,महादेव पाटील,निलम वेटकोळी,प्र. प्रा.दिगंबर टेकळे, प्रा. एम. एस. जाधव, माजी विद्यार्थी संघटना समन्वयक के.एस.भोसले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केले आहे.