दिल्लीकरांना माथेरानच्या वस्तूंची भूरळ

ओम महिला बचत गटातर्फे चामड्यांच्या वस्तूंची विक्री

| नेरळ | प्रतिनिधी |

महिला बचत गटाच्या माध्यमातून चामड्याच्या वस्तूची निर्मिती करणार्‍या ओम महिला बचत गटाने या व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे. स्वयंसहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून चपला, बूट, पर्स, बॅग यांची निर्मिती करणार्‍या ओम महिला बचत गटाने थेट नवी दिल्ली मध्ये भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात या वस्तूंचे स्टॉल लावले आहे.

पर्यटनावर अवलंबून असलेल्या या पर्यटक स्थळी असलेले थंडगार वातावरण यामुळे चामड्याच्या वस्तूंची निर्मिती देखील त्याच पद्धतीने होत असते. त्यात त्या वस्तूंची आवड देखील जगभरातील पर्यटकांना असून अनेक खेळाडू हे माथेरान मधील चामड्याच्या वस्तूंच्या प्रेमात पडले आहेत. त्यामुळे बाहेर कुठेही असले तरी माथेरानमधून त्यांच्या मागणीनुसार बूट, चपला बनवून पाठविल्या जात असतात. त्यामुळे माथेरान मधील चामड्याच्या वस्तूंचे आकर्षण लक्षात घेऊन नवी दिल्लीमध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन भरले जाते आणि त्या आंतराराष्ट्रीय प्रदर्शनात माथेरान मधील चामड्याच्या वस्तूंसाठी एक स्टॉल देण्यात आला आहे. मात्र त्या स्टॉल मध्ये कोणीही व्यवसायिक नाहीतर माथेरान आणि परिसरातील महिलांना एकत्र घेऊन स्वयंरोजगार मधून व्यवसाय निर्माण करणार्‍या ओम महिला बचत गटाला ही संधी मिळाली आहे.

येथील चर्मउद्योग हा माथेरान येथील प्रमुख व्यवसाय असून या व्यवसायाच्या माध्यमातून चपला बूट सँडल व लेडीज जेन्स पर्स बेल्ट व चामडी वस्तू स्वतः बनवणारे एकापेक्षा एक कारागीर माथेरान मध्ये आढळून येत आहेत. यातीलच एक समूह म्हणजेच ओम महिला बचत गट हर्षदा चंद्रकांत काळे या आपल्या व्यवसायाकरिता भारतातील अनेक राज्यात आपल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यावसायिक करत आहेत. माथेरानच्या चामडी कोल्हापुरी चपला आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये भारतभर आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून पोहोचवल्या असता दिल्ली येथील दिनांक 14 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये ओम महिला बचत गटाच्या माध्यमातून माथेरानच्या ओम महिला बचत गटाच्या स्टॉल ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तेथे कोल्हापुरी चपलांसह फॅन्सी लेदर उत्पादनांना आंतराष्ट्रीय ग्राहकांचा या वस्तूंच्या खरेदीसाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ग्रामीण गावातून आलेले महिला बचत गट व त्यांनी उत्पादित केलेली उत्पादने महाराष्ट्र पॅव्हिलियन सह आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये एक वेगळेच नावलौकिक मिळवत आहेत. माथेरान सह नेरळ सह कर्जत तालुका रायगड जिल्ह्यातील नामांकित ठरलेल्या महिला बचत गटाचे उत्पादने माथेरानच्या हॅन्डमेड लेदर चपला शूज व सँडल्स यांना बचत गटाच्या अध्यक्ष हर्षदा चंद्रकांत काळे यांच्या उत्पादित उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार देण्याचे काम या महिला बचत गटाने केले आहे. महाराष्ट्रातील बचत गटातील हर्षदा काळे यांच्यासह या बचत गटाच्या प्रतिभा मेंगाळे, इंदुबाई काळे आणि त्यांच्या मदतीला चंद्रकांत काळे नवी दिल्ली मध्ये माथेरानच्या वस्तूंची विक्री करण्यात आघाडीवर आहेत.

Exit mobile version