कैद्यांचे जामीन अर्ज तातडीने पोहोचवा -चंद्रचूड

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांनी तुरुंग अधिकार्‍यांपर्यंत जामिनाचे आदेश पोहोचण्यात होणारा विलंब ही अत्यंत गंभीर त्रुटी असल्याचे म्हणत ही समस्या युद्धपातळीवर सोडवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रत्येक अंडरट्रायल कैद्याच्या ङ्गस्वातंत्र्याफवर या समस्येचा परिणाम होत असल्याचे न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांनी म्हटले आहे. याचिकाकर्त्यांना ऑनलाइन कायदेशीर मदत देण्यासाठी ङ्गई-सेवा केंद्रेफ आणि डिजिटल न्यायालयांचे उद्घाटन करण्यासाठी आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात न्यायमूर्ती चंद्रचूड बोलत होते.
फौजदारी न्याय व्यवस्थेतील सर्वात गंभीर त्रुटी म्हणजे जामीन आदेश पोहचवण्यास होणारा विलंब आणि ही समस्या युद्धपातळीवर हाताळली जाणे आवश्यक आहे, कारण याचा परिणाम प्रत्येक अंडरट्रायल कैदी किंवा अगदी एखाद्या कैद्याच्या स्वातंत्र्यावर होतो ज्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे, असे न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले.

Exit mobile version