अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिका समोर जाहिरातींचे होर्डिंग लावणाऱ्या जाहिरात फलक कंपनी (रोशन ॲडव्हरटायझिंग) याच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे आंदोलन छेडून करण्यात आली. हे आंदोलन युवक प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, सूरदास गोवारी, फारुख पटेल, उत्तमराव गायकवाड, मोद बागल, राजश्री कदम, रेणुका पगारे, मुनीर तांबोळी, सनी फडके, संतोष शेट्टी, दीपिका भांडारकर, मनोज भगत, प्रशांत जाधव या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, महिला, युवक कार्यकर्ते आदी बहू संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version