| रसायनी | प्रतिनिधी |
अखिल आर्यंवत संघ-आंतरराष्ट्रीय बजरंग दलाने लव्ह जिहादविरोधात रायगडसह मुंबईत आवाज उठवला आहे. संघटनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश पाटील यांनी पोलीस उपायुक्त बोराडे यांची भेट घेऊन गुन्हे शाखेला लेखी पत्र देत लव्ह जिहादविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पत्रात यांनी दोन नाबालीक हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून पळवले आहे व हा लव्ह जिहादचा प्रकार आहे, असे दिनेश पाटील यांनी नमूद केले आहे. तसेच, अखिल आर्यवत संघ-अंतराष्ट्रीय बजरंग दलाने वारंवार लव्ह जिहादविरोधात आवाज उठवला आहे आणि सरकारकडून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असूनही, आरोपींचे नाव एफआयआरमध्ये घेतले नाही, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ही बाब गांभीर्याने घ्या आणि लव्ह जिहादविरोधात तात्काळ कारवाई करा. नाहीतर महात्मा गांधी यांच्या विचाराने आणि संविधानाने दिलेल्या अधिकाराने हिंदू मुलींच्या रक्षणासाठी भिवंडीमध्ये उग्र आंदोलन घेण्यात येईल आणि होणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असणार आहे, अशी विनंती देखील त्यांनी पोलीस उपायुक्तांना केली आहे. यावेळी कोकण प्रांत अध्यक्ष अनिल यादव, राकेश रायचुरा, गिता वाकडे, केवल वाकडे व सर्वं आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.







