। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली सर्कसह एस.टी स्टॅन्ड परिसरात फिरणार्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मागणी परिसरातील रहिवासी व वाहनचालक करीत आहेत. कळंबोली सर्कल येथे सिग्नलला गाडी थांबताच वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी किंवा पावसाळ्यामध्ये गाड्यांच्या काचा पुसण्यासाठी तर काही वेळा भीक मागण्यासाठी अल्पवयीन मुले टोळ्याने फिरत असतात. भर पावसात हि मुले अचानक वाहनांच्या पुढे आल्याने अपघात सुद्धा घडत असतात. अशीच अवस्था नवीन पनवेल येथील सिग्नल व पनवेल बस स्थानक परिसरात आहे. तरी अस्या मुलांना ताब्यात घेऊन त्यांना योग्य मार्गी लावणे घरजेचे बनले आहे. यासाठी संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी रहिवासी व वाहनचालक यांच्याकडून होत आहे.







