। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील गिरी यांच्यामुळे शिष्टाईमुळे एका केळी व्यापार्याला न्याय मिळाला आहे. त्यामुळे व्यापार्याने पोलिसांचे आभार मानले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील केळ्याचे व्यापारी अक्षय पोटे यांनी आपला माल पनवेलमधील एका व्यापार्याला विकला होता. मात्र तो त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होता याबाबत पोटे यांनी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत व्यापार्याला बोलावून घेऊन सदर केळी व्यापार्याचे पैसे मिळवून दिले.