| पनवेल | प्रतिनिधी |
परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या व्यक्तींसाठी फीव्हर लसीकरण केंद्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुरु करण्याची मागणी ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियनच्यावतीने युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांनी नवी मुंबईचे महापौर यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनाद्धोरे केली आहे. या निवेदनात संजय पवार यांनी म्हटले आहे की, नवी मुंबई येथे उभारण्यात आलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भविष्यात आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनणार आहे. या विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रवासी सीफेरर्स कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच परदेशात नोकरीसाठी जाणारे कामगार प्रवास करणार आहेत. अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार काही देशांमध्ये प्रवास करण्यासाठी यलो फीव्हर लसीकरण अनिवार्य आहे. सध्या नवी मुंबई परिसरात अधिकृत यलो फीव्हर लसीकरण केंद्र उपलब्ध नसल्यामुळे सीफेरर्स तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मर्चट नेव्ही मध्ये कार्यरत असलेल्या हजारो सीफेरर्सना जहाजावर जॉईन होण्यासाठी ही लस अनिवार्य स्वरूपात घ्यावी लागते.नवी मुंबई हे भारतातीत एक महत्वाचे मर्चेंट नेव्ही आणि सागरी व्यवसाय केंद्र बनले आहे. त्यामुळे सार्वजनिक हित लक्षात घेता खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी अधिकृत यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे.







