। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील धाकटे वेणगाव येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सदर ठेकेदार याच्यावर कारवाई करावी त्याचे बिल अदा करू नये अशी मागणी एका निवेदनाद्वारे ग्रामस्थांची केली आहे. धाकटे वेणगाव यथे डोंगरी विकास अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीचे काम करण्यात आले आहे, परंतु काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, हा रस्त्याची एक महिन्याच्या आत चाळण झाली आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी रायगड जिल्हा परिषदेचे उपअभियंता कर्जत यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. त्यानंतर इंजिनियर जाग्यावर येवून पहाणी करून गेले होते. परंतु 28 मार्च रोजी सकाळ पासून रस्त्यावर पाणी मारून साफसफाई चालू करून वरच्या वर डागडुजी केली आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की सदर ठेकेदारावर कारवाई करून नवीन रस्ता बनवून दिल्या शिवाय त्याचे बिल अदा करू नये. अन्यथा आम्ही ग्रामस्थ तीव्र आंदोलन करू असे निवेदनात नमूद केले आहे.