। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील प्रतिष्ठेच्या नेरळ विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाली. अध्यक्ष पदावर ज्येष्ठ सदस्य माजी उपसरपंच राजेंद्र महादेव विरले यांची तर उपाध्यक्ष म्हणून माजी सरपंच रवींद्र शिवाजी झांजे यांची बिनविरोध निवड झाली. सोसायटीवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर शेतकरी कामगार पक्षाच्या संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे.
कर्जत तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत यांची बनलेल्या नेरळ विविध कार्यकारी सेवा संस्था यांची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाली होती. त्या निवडणुकीनंतर मंगळवारी (दि.29) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. पीठासीन अधिकारी ए.ए.मदने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी राजेंद्र महादेव विरले तर उपाध्यक्ष पदासाठी रवींद्र शिवाजी झांजे यांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यावेळी नेरळ सोसायटीचे सदस्य राजेंद्र हजारे, विष्णू कालेकर, वैभव भगत, नामदेव तरे, यशवंत कराळे, सावळाराम जाधव, शशिकांत मोहिते, अर्चना शेळके, कुंदा सोनावळे, संजय शिंदे, धोंडू आखाडे आदी सर्व सदस्य उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार आणि प्रभारी तालुका चिटणीस श्रीराम राणे, युवक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष महेश म्हसे, माजी उपसरपंच रामदास हजारे, ग्रामपंचायत सदस्य संदीप मोरे, तसेच चंद्रकांत मुंढे, विलास भागीत, पंढरीनाथ भागीत, गोविंद पेमारे, विलास लहाने, हरिचंद्र विरले, मंगेश शिनारे, अनंता बागडे, सुशील कालेकर, दशरथ शेंडे, किसान पाटील, दिलीप पेमारे आदींसह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.