। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागड वंचित बहुजन आघाडीतर्फे आ. संतोष बांगर यांच्या पुतळ्याचे परळी येथे दहन करण्यात आले. बांगर यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांगर यांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. आणि त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष अमित गायकवाड, चंद्रकांत साळुंखे, अशोक वाघमारे, मंगेश वाघमारे, आनंद जाधव, चंद्रकांत जगताप, मारुती साळुंखे, रामचंद्र मोरे, प्रवीण गायकवाड,रवी लोखंडे, कल्पेश गायकवाड, प्रणय गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.