आमदार शेखर निकम यांची सदिच्छा भेट
। चिपळूण । प्रतिनिधी ।
दसपटी विभागातील आकळे ग्रामस्थ यांच्या वतीने गावातील तरुणांना कबड्डी खेळ दाखवता यावा यासाठी श्री केदारेश्वर प्रीमिअर कबड्डी लीग चे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेला आमदार शेखर निकम यांनी शुभेच्या दिल्या. अशा स्पर्धेतूनच गावातील खेळाडू भविष्यात चांगले तयार होतील असेही म्हणाले.
यावेळी त्यांच्या सोबत स्वप्नील शिंदे , दिनेश शिंदे, राजाराम देवरे , भाऊ जागुष्टे , विजय टाकले, अमित जोशी , विनायक कदम , संतोष कदम , दत्ताराम मनवळ , संदीप मानवल, प्रकाश पवार , गणेश गजमल , सुरेश कदम , संदेश शिंदे, मोहन शेट्ये , विश्वनाथ शेट्ये, सौ. कदम आदी मान्यवर उपस्थित होते.