। सुतारवाडी। वार्ताहर ।
आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या चार वर्षापासून पत्रकार सदस्यांची निवड केलेली नाही. यापूर्वी मोतीराम तेलंगे हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष असताना त्या समितीवर पत्रकार सदस्य नियुक्त होते. त्यामुळे वेळोवेळी होणार्या सभा तसेच आरोग्य केंद्रातील रिक्त जागा आरोग्य केंद्रातील औषधासाठी तसेच अन्य महत्वाच्या घडामोडींची वर्तमानपत्रांतून माहिती नागरिकांपर्यंत पोहोचायची.अनेक ठिकाणच्या आरोग्य केंद्रामध्ये सल्लागार समितीवर पत्रकार सदस्य आहेत. मात्र आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही नियुक्ती अद्यापही झालेली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पूर्वी या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. अनेक कर्मचार्यांच्या जागा रिक्त होत्या. त्यावेळी पत्रकार सदस्याने सविस्तर वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास ह्या बाबी आणल्या होत्या. ज्यावेळी एक वैद्यकीय अधिकारी किंवा दोन वैद्यकीय अधिकारी होते त्या ठिकाणी आता तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र मुंबई- गोवा महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे तसेच दिवसातून किमान 25 पेक्षा जादा रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे पत्रकार सदस्याची नियुक्तीची मागणी होत आहे.