| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील स्थानिक भूमिपूत्र शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने संपादीत करून शासनाने अनेकांना भूमिहीन केले आहे. मात्र, या जमिनीवर मोठ्या प्रमाणात विकास होत असताना उरणच्या स्थानिक भूमिपुत्रांना आरोग्य व सामाजिक सुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत. त्या मिळण्यासाठी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी सिडकोकडे मागणी केली आहे.
2006 साली उरणमध्ये एका सुसज्ज हॉस्पिटलसाठी सिडकोने निर्धारीत केलेल्या भूखंडावर भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर 4 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेसुद्धा त्याच निर्धारीत भुखंडावर पुन्हा एकदा हॉस्पिटलचे भूमिपूजन पार पडले.परंतु, आज 15 वर्ष उलटूनही त्या जागेवर एक विटही रचण्यात आलेली नाही. ही बाब अत्यंत निराशाजनक असून चिड आणणारी आहे. ही समस्या गांभीर्याने लक्षात घेऊन तरी सिडको व्यवस्थापनाने आर्थिक तरतूद करून इमारत उभी करावी. तसेच, आर्थिक तरतुदीसह भूमिपूत्र भवनासाठी जागा निश्चित करून भूमिपूत्र भवनसुद्धा उभे करावे व स्थानिक भूमिपुत्रांना काही अंशी न्याय द्यावा, अशी मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी सिडकोकडे केली आहे.
सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याची मागणी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606