। सुतारवाडी । वार्ताहर ।
पावसाळा सुरू झाला की ग्राहकांची मोठी पसंती असते ती मक्याच्या कणसांना. यावर्षीही रोहा बाजारपेठेत मक्याची कणसं मोठ्या प्रमाणावर विक्रीस उपलब्ध असून, तीन कणसं पन्नास रुपयांना विकली जात आहेत. मक्याच्या कणसांबरोबर भुईमुगाच्या शेंगांनाही ग्राहकांची मागणी असून, साठ ते सत्तर रुपये किलो दराने शेंगा विकल्या जात आहेत.
तोतापुरी आंबे हात गाडीवर मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. कोलाड-रोहा बाजारपेठेत आदिवासी भगिनी विविध प्रकारच्या गावठी भाज्या विक्रीसाठी ठेवत असून, गावठी भाज्यांना ग्राहकांची मागणी ही मोठ्या प्रमाणावर आहे. शेवळं, माठ यांच्या जुड्या रु. दहाला विक्रीस उपलब्ध आहेत. थोड्या प्रमाणावर लहान मासे तसेच मुठेही बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. सध्या ऊन-पावसाचा खेळ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वल्गनीचे मासे मिळायचे ते अद्याप दिसत नाहीत, मात्र बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर मक्याची कणसं, भूईशेंगा, तोतापुरी आंबे मोठ्या प्रमाणावर बाजारात दिसत आहेत.