| उरण | प्रतिनिधी |
सद्या सुरू असलेल्या रमजाननिमित्त उरण बाजारपेठेत फळांना मागणी वाढली आहे. रमजान महिन्यात मुस्लिम धर्मीय (रोजा) उपवास पकडतात आणि सायंकाळी फळांचे सेवन करून इफ्तारी करतात. त्यामुळे उरण शहरातील बाजारपेठेत फळांची मागणी वाढल्याने आवक देखील वाढली आहे. रमजान महिन्यात उपवास करताना मुस्लिम धर्मीय दिवसभर पाण्याचा एकही थेंब न पिता उपवास करतात आणि सायंकाळी इफ्तार करुन उपवास सोडला जातो. उपवास सोडताना यात रसाळ फळे अधिक असतात. त्यामुळे या दिवसात कलिंगड, आंबा, पपई, खरबूज, अननस, चिकू, द्राक्षे, संत्र अशा रसाळ फळांना अधिक मागणी असते. त्यामुळे रमजान सणानिमित्त उरण बाजारपेठेत उलाढालही वाढते. उरण बाजारपेठेतील सध्या रसाळ फळांचे दर कलिंगड 40 रु. प्रतिकिलो, चिकू 120 रु. किलो, द्राक्षे 120 रु. किलो, अननस 140 रु. किलो, पपई 70 रु. किलो, खरबूज 50 रु. किलो, संत्र 140 रु. किलो, आंबा 300 रु. किलो याप्रमाणे असून रमजाननिमित्त या फळांना नागरिकांकडून मोठी मागणी आहे. उरणमध्ये मुस्लिम धर्मीय बांधव मोठ्या प्रमाणात उपवास पकडतात, त्यामुळे रमजानमध्ये फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
उरणमध्ये फळांना मागणी वाढली
