लेटलतिफ कर्मचार्‍यांना दणका

तहसिल कार्यालयात बायोमेट्रिक मशीन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पाली तहसीलसह व इतर शासकीय कार्यालयातील लेटलतीफ व मुख्यालयी न राहणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी. कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रविंद्रनाथ ओव्हाळ यांनी मे महिन्यात पाली तहसील कार्यालय आवारात उपोषण केले होते. त्या उपोषणाची दखल घेत तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी पाली तहसील कार्यालयात तर पाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यादव यांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर बायोमेट्रिक मशीन बसविले आहे.

यामुळे लेटलतीफ कर्मचार्‍यांना आळा बसला आहे. शासकीय कार्यालयातील कर्मचारी आता वेळवर येत असल्याने कार्यालयात कामानिमित्त येणार्‍या नागरिकांची कामे देखील वेळेवर होतांना दिसत आहेत. याबद्दल तालुक्यातील लोकांनी रवींद्रनाथ ओव्हाळ यांचे आभार मानले. सरकारी कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसविल्याने कर्मचारी वेळेत पोहचत आहेत. व लवकर बाहेर पडत नाहीत. मात्र मुख्यालयी न राहणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी करून त्यांना मुख्यालयी राहण्यास आदेश काढल्यास सर्वसामान्य नागरिकांची सरकारी कामे अधिक गतिमान होतील. अशी अपेक्षाही ओव्हाळ यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version