| चिरनेर | वार्ताहर |
उरण पूर्व विभागातील चिरनेर, कोप्रोली, दिघोडे गावांच्या मुख्य नाक्यांवर नाकाबंदीच्या माध्यमातून, पोलीस चेक पोस्ट बसविण्यात यावे अशी मागणी चिरनेर, कळंबुसरे, मोठीजुई, कोप्रोली, दिघोडे, विंधणे या उरण पूर्व विभागातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संबंधित सरपंचांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत चोरांचा योग्य बंदोबस्त झाला नाही. तर पूर्व विभागातील सर्व जनता रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही दिलेल्या लेखी निवेदनातून दिला आहे. दरम्यान चोरांना आळा बसण्यासाठी आम्ही योग्य ती उपायोजना करू असे आश्वासन देखील पोलीस आयुक्त (गुन्हे अन्वेषण) नवी मुंबई श्री काळे यांनी दिले आहे. याप्रसंगी संतोष ठाकूर, चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, अलंकार परदेशी, संजय पाटील, शेकापचे माजी चिटणीस सुरेश पाटील या सर्वांच्या उपस्थितीत नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले.