। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
रणरणत्या उन्हामध्ये अंगाची लाही होत असताना, नागरिक स्वतःच्या आरोग्याची खबरदारी घेतांना दिसू लागले आहेत. यामुळे या उन्हाळ्यामध्ये आपली तृष्णा शांत करण्यासाठी मिनरल वॉटर घेण्याकडे आनेकांचा कल निर्माण होत आहे.
पूर्वी प्रत्येक ठिकाणी वाटसरुची तहान भागविण्यासाठी पाणपोई उपलब्ध असायची, मात्र आता आरोग्याचा विचार करुन प्रत्येकजण मिनरल वॉटरचा वापर करीत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. पानटपरी, हॉटेल, किराणा दुकान, लहान व्यावसायीक यांच्याकडे मिनरल वॉटर सहजपणे उपलब्ध होत असल्याने नागरिकांची तहान भागविण्याला त्यातून मदत होत आहे.