पत्रकार संघाच्या मागणीला यश
| उरण | वार्ताहर |
उरणमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. त्या मागणीला यश आले असून अनेक ठिकाणचे होर्डिंग्ज उतरविण्यात आले आहेत.
उरण तालुक्यात सिडको द्रोणगिरी व उरण पनवेल महामार्गावर रस्त्याच्याकडेला शासकीय जागेवर अनधिकृत होर्डिंग्जचे साम्राज्य उभे राहिले आहे. शासकीय यंत्रणेचे अर्थपूर्ण हीतसबंध असल्याने जाहिरातीची एजन्सी चालविण्याऱ्यांवर कारवाई होत नाही. काही दिवसांपूर्वी मुंबई घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा बळी गेला तर कित्येकजण जखमी झाले आहेत. या होर्डिंग्जमुळे दुर्घटना घडण्याच्या घटनेत वाढ होत आहे. उरण तालुक्यातही अशाप्रकारे अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज लाणण्यात आले होते. मात्र, या अनधिकृत होर्डिंग्जवर ठोस कारवाई करण्यात येत नाही. अशाप्रकारे लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्जवर त्वरित करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. या मागणीला यश आले असून काही ठिकाणचे होर्डिंग्ज उतरविण्यात आले आहे.
उरण ते जेएनपीटी वसाहत स्ंकुलापर्यंतच्या मार्गावरील होर्डिंग्ज उतरविण्यात आले असले तरी होर्डिंग्ज उतरविणाऱ्या कामगारांनी कोणत्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून वीर वाजेकर विद्यालयाच्या समोरील नवघर उड्डाणपुला जवळील होर्डिंग्ज अजूनही जाहिरातीसह जाणीवपूर्वक जपून ठेवला आहे. याची चर्चा आत्ता नाक्यांनाक्यावर सुरू आहे.