पुलाच्या कठडे दुरुस्तीची मागणी

| तळा | प्रतिनिधी |

तळा तालुक्यातील तळा-तळेगाव मार्गावरील केळशी वानस्ते येथील संगम पुलावरील संरक्षक पाईप निघाले आहेत. या पुलावरून तळेगाव, पन्हेळी, मालुक, भानंगकोंड, उसर व पुढे माणगावकडे मोठ्या प्रमाणात वाहने जात असतात. परंतु, पुलाचे सरंक्षक पाईप निघाल्याने केव्हाही अपघात होण्याचा धोका संभवतो. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला की या पुलावरून पाणी जाते. त्यामुळे या पुलावर कठडे असणे आवश्यक असल्याचे जानकार म्हणत आहेत. तसेच, याच पुलाच्या पश्चिमेकडील भागाच्या कॉक्रीटीकरणाचा स्लॅबमधील आतील स्टील दिसत आहे. त्यामुळे हा देखील धोका लक्षात घेऊन त्याचीही दुरुस्ती करणे आवश्यक आहे. हि सर्व कामे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. तरी या पुलाची लवकरात लवकर दुरुस्त व्हावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतून होत आहे.

Exit mobile version