राखीव बेडची मागणी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलमधील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपाजिल्हा रुग्णालय येथे विविध प्रकारच्या आरोग्य सुविधाचा लाभ नागरिकांकडून घेतला जातो. पनवेलमध्ये विविध दैनिक, साप्ताहिक, यु ट्यूब, पोर्टल यांचे संपादक व वार्ताहर, कॅमेरामन कार्यरत आहेत. त्यांच्या आरोग्याचा विषय लक्षात घेऊन पनवेलमधील पत्रकार बंधू-भगिनींसाठी 5 सुसज्ज बेड कायम राखीव ठेवण्याची तरतूद करुन पत्रकारांसाठी विनामूल्य रुग्णवाहिका देखील उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती केवल महाडिक यांनी वैद्यकीय अधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे. तर, लवकरच आम्ही या पत्राचा विचार करुन याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्‍वासन वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

Exit mobile version