उरण चार फाटा ते करंजा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

। जेएनपीटी । वार्ताहर ।
चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीचे मंगेश थळी यांनी उरण चार फाटा ते करंजा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा असून नागरीकरण ही झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे येथील रहिवाशांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास मोठ्या प्रमाणात चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीला अडचणी निर्माण होत आहेत.त्यात याच ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील उरण चार फाटा ते करंजा बंदर हा रस्ता अलिबाग व उरण, मुंबई, नवीमुंबई शहराला जोडणारा महत्त्वाचा रहिवाशांच्या, प्रवासी वाहनांच्या रहदारीचा रस्ता आहे. सध्या उरण चार फाटा ते करंजा रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने या रस्त्यावरून मार्गक्रमण करणार्‍या प्रवाशी वाहनांना, नागरिकांना,भाविकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याची दखल चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीचे थळी यांनी घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना उरण चार फाटा ते करंजा बंदर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version