आधुनिक टाक्या उभारण्याची मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महापालिका क्षेत्रात वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, जलसाठा क्षमतेच्या अभावामुळे परिस्थिती गंभीर होत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने जुन्या जलकुंभांच्या जागी आधुनिक भूमिगत टाक्या उभाराव्यात, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पनवेल जिल्हाप्रमुख दीपक निकम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. सध्या सिडको महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नवी मुंबई महापालिका, एमआयडीसी आणि हेटवणे पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे. मात्र, वाढती मागणी आणि मर्यादित पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा, अनियमित वेळा आणि टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अनेक जुने जलकुंभ हटवले गेले, मात्र पर्यायी साठा निर्माण झाला नाही. काही ठिकाणी बंद जलकुंभनिष्क्रिय आहेत पाणीपुरवठा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यापूर्वी आवश्यक सुविधा उभाराव्यात अन्यथा भविष्यात गंभीर संकट निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. पुरेसा पाणीपुरवठ्यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची मागणी निकम यांनी केली आहे.

Exit mobile version