डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची मागणी

माणगाव | प्रतिनिधी |
लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यापीठात आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात आला आहे. मात्र या पुतळ्याचे अनावरण करण्यास विलंब लागत आहे. या पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करावे. अशी मागणी बौध्द धम्म समितीचे संस्थापक पंकज तांबे यांनी आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान जोगी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे
यावेळी बौध्द धम्म समितीचे कार्यकर्ते स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव विकास गायकवाड, कुलगुरूंचे स्विय सहाय्यक प्रसाद पेंडसे यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version