खाजणी-घोसाळा रस्ता रुंद करण्याची मागणी

। मुरूड । प्रतिनिधी ।
मुरूड-भालगाव-रोहा मार्गावर अरुंद रस्त्यामुळे अपघात होत आहेत. अपघातानंतर वाहतूक कोंडी होत आहे. प्रवाशांना व वाहनांना तासनतास अडकून राहावे लागत आहे. त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण करण्यात यावा अशी मागणी वाहन चालकांनी व स्थानिकांनी केली आहे. मुरूड भालगाव रोहा मार्गावर खाजणी ते घोसाळा हा सुमारे 10 कि.मी. चा रस्ता अत्यंत अरुंद आहे. या रस्त्यावर अनेक वळणे आहेत. त्यामुळे या परिसरात एकाच महिन्यात दोनदा मोठे मोठे अपघात होता होता राहिली. 18 जुलै रोजी मुरुड-भालगाव- रोहा एस.टी. मुरुड येथून रोहा-भालगाव- मुरुड ही रोहा सुटणारी या दोन्ही गाड्या घोसाळा खाजणी दरम्यान अरुंद रस्त्यामुळे साईड देत असताना रस्त्याच्या साईड पट्ट्या निसरड्या झाल्या असल्यामुळे रोहा- मुरुड एस.टी. बस खचली सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. परंतु एस.टी.अडकून पडल्याने सुमारे या मार्गावर दोन तास वाहतूक खोळंबली होती.हा मार्ग अरुंद असल्याकारणाने व असंख्य वळणे असल्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी वेळीच सा.बा. विभागाने लक्ष देऊन हा राहीलेला खाजणी ते घोसाळा 10 कि.मी चा रस्ता रुंदीकरण करावा अशी मागणी वाहन चालकांनी व स्थानिक प्रवाशांनी केली आहे.

Exit mobile version