क्रीडांगण विकसित करण्याची मागणी

| पनवेल । वार्ताहर ।

खारघर वसाहत परिसरात सामान्य नागरिकांसाठी क्रीडांगण विकसित करण्याची मंगेश रानवडे यानी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदना मार्फत मागणी करण्यात आली आहे. आपल्या मुलांना खेळण्याकरिता तथा विरंगुळा मिळण्याठी एक उत्तम क्रीडांगण मिळेल या आशेने नागरिकांनी या प्लॉट सभोवताली वसलेल्या अनेक ग्रह संकुलामध्ये सदनिका विकत घेतल्या. मात्र जेव्हा-जेव्हा नागरिक अथवा लहान मुले इकडे खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत तेव्हा-तेव्हा स्थानिक मंडळी त्यांना शिवीगाळ करून, दमदाटी करून, खेळण्यासाठी वापरण्यास मज्जाव करत असल्याने, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

इतकेच थांबले नाही तर पनवेल महानगरपालिकांनी लावलेला आपल्या मालकी हक्काचा बोर्ड ही ह्या प्लॉट वरून रातोरात गायब केला गेला आहे, या गोष्टीची गंभीर दखल घेत इम्तियाज शेख यांनी महानगर संघटक क्षेत्र पनवेल मंगेश रानवडे यांच्या निदर्शनास ही बाब आणली. महानगरपालिकेने या जागी आपला मालकीचा बोर्ड लावून, व येथील नागरिकांना या प्लॉटमध्ये क्रीडांगण म्हणून वापरण्याची लवकरात लवकर देण्याचे मागणी शिंदे गटाने निवेदन पत्र मार्फत केली आहे. यावेळी आयुक्त देशमुख यांनी याबाबत चौकशी करून पुढची कारवाही लवकरात लवकर करण्याची ग्वाही दिली.

Exit mobile version