वाहतुक कोंडी सोडविण्याची मागणी

| उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यात वाहतूक कोंडीची समस्यां कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यासंदर्भात वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी वाहतूक कोंडी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. पुर्वविभागातील खोपटा-कोप्रोली नाका, गव्हाण फाटा ते दिघोडे आणि चिरले ते दिघोडे रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीला सर्व सामान्य जनतेला रोज सामोरे जावे लागत आहे. म्हणून पोलीस ठाण्याचे क्राईम पीआय सुहास चव्हाण, संजय पवार, सत्यवान भगत, अलका म्हात्रे, बबन ठाकूर आदींनी वाहतूक कोंडी कशामुळे होते याची माहिती दिली.

Exit mobile version