पावसाळ्यात ई-रिक्षा सुरु करण्याची मागणी

| माथेरान | वार्ताहर |

पावसाळ्यात ई-रिक्षा नागरिकांना फारच उपयुक्त ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर रिक्षा संघटनेने नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांबाबत सविस्तर चर्चा केली व ई-रिक्षा सुरू करण्याची मागणी केली.

श्रमिक रिक्षा संघटनेचे याचिकाकर्ते सुनील शिंदे यांनी सांगितले की, आतापर्यंत न्यायालयाने तीन आदेश आलेले आहेत. पहिला आदेश दि. 12 मे 2022 रोजी देण्यात आला. या आदेशातच ई-रिक्षा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, ई-रिक्षा सुरू करण्याऐवजी सात रिक्षा आजही बंद अवस्थेत आहेत. ई-रिक्षा सुरू करण्याची परवानगी श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे, शैलेश भोसले व संजय भोसले यांनी देण्याची मागणी केली. खा. श्रीरंग बारणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ई-रिक्षा सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवलोकन करून निर्णय घेण्यास सांगितले आहे.

Exit mobile version