महिला दिनानिमित्त लोकशाही गप्पा

। अलिबाग । वार्ताहर ।
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च रोजी पीएनपी नाट्यगृह, अलिबाग येथे सकाळी 11 वाजता मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र, जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रिया आणि लोकशाही या विषयावर लोकशाही गप्पा भाग 5 होणार आहे. या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी, प्रयोगशील शिक्षक पाटील, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख, प्राध्यापक डॉ. श्याम पाखरे, पत्रकार जयंत धुळप, सामाजिक कार्यकर्ते डॉ. दीपक पवार या सर्व वक्त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र श्रीकांत देशपांडे, सहआयोजक प्रा.जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग डॉ. अनिल पाटील, सहआयोजक जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे.

Exit mobile version