मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांचे आवाहन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ज्या समाजामध्ये स्त्रिया आहेत, त्या समाजाचे घटक पुरुष आहेत. या पुरुषप्रधान समाजामध्ये महिलांच्या समस्यांवर उत्तर शोधण्याचे काम पुरुषांचे सुद्धा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी अलिबाग येथे केले. जागतिक महिला दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा निवडणूक कार्यालय, जे.एस.एम महाविद्यालयाद्वारा अलिबाग येथील पी.एन.पी नाट्यगृह येथे स्त्रिया आणि लोकशाही – लोकशाही गप्पा (भाग 5) या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम जरी महिला दिनाचा तरी तो केवळ महिलांसाठी नाही आहे तर हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळेच सर्वांना हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला. स्त्रियांच्या समस्या कुठे सुरू होतात, तर त्या जन्म घेण्याच्या आगोदरच सुरू होतात. स्त्रीभ्रूणहत्येपासून त्यांच्या ज्या समस्या सुरू होतात त्यानंतर कुटुंबातील त्यांना देण्यात येणारी वेगळी वागणूक, विविध क्षेत्रात काम करीत असताना स्त्रियांना येणार्या समस्या यांचा मागोवा यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला.
या निमित्ताने आयोजित परिसंवादात सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी, वैशाली पाटील, मुमताज शेख, शशिकांत सोनावणे, तसेच प्रयोगशील शिक्षक सुजाता पाटील, पत्रकार जयंत धुळप, प्रा.श्याम पाखरे, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे मान्यवर सहभागी झाले होते. तर मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ.दीपक पवार हे या परिसंवादाचे संवादक होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते तृतीयपंथियांचा विशेष सन्मान करण्यात आला. जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग आणि रायगड जिल्हा निवडणूक कार्यालय हे या परिसंवादाचे सहआयोजक होते. विद्यार्थ्यांमध्ये लिंगभाव समतेची जाणीव-जागृती होण्याच्या दृष्टीने परिसंवादात चर्चा करण्यात आली. या परिसवांदाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या हीींिीं://लशे.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप/ या संकेतस्थळावरून आणि समाजमाध्यमांवरून थेट प्रक्षेपणही करण्यात आले. आभार प्रदर्शन डॉ.दीपक पवार यांनी केले.