दिव्यांगानी मतदान करुन लोकशाही बळकट करावी: शिवाजी पाटील

| तळा | वृत्तसंस्था |

लोकशाही भक्कम करण्यासाठी मतदान करणे ही आपली जबाबदारी दिव्यांगांनी न थकता न थांबता लोकसभा निवडणुकीत मागे न राहता 100 टक्के मतदान करून आपला सहभाग दर्शवून समाजापुढे आदर्श निर्माण करावा व त्यामुळे समाजातील लोकांचा आपल्याकडे बघून सहभाग वाढेल. तसेच दिव्यागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. जसे की दिव्यांगाना घरूनच मतदान, मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था, रॅम रेलिंग, वाहनव्यवस्था तसेच दिव्यांगांना मदतनीसाची सोय केली असून आपण व इतरांनादेखील मदानाला प्रवृत करा, असे आवाहन सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे राज्य सचिव तथा ऑल स्पोर्ट्स असोसिएशन फॉर डिसेंबल्ड अँड रेहाबिलीटेशन महाराष्ट्र राज्याध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केले.

तळा तहसील कार्यालय, नगरपंचायत व सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था तळा यांच्या संयुक्त विद्यमाने तळा नगरपंचायत सभागृहात संपन्न झाला. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार भारत जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे तळा अध्यक्ष किशोर पितळे, सचीव अमिश भौड, राज्य सचिव शिवाजी पाटील व दिव्यांग सभासद, मंडळ अधिकारी दिनेश गुजराथी, तळा तलाठी किशोर मालुसरे, तलाठी महाडिक, कोतवाल तेलंगे, अडखळले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर मालुसरे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता मतदान प्रतिज्ञा करून करण्यात आली. तसेच नगरपंचायतीच्या माध्यमातून माझी वसुंधरा संरक्षण शपथ घेऊन सांगता करण्यात आली.

Exit mobile version