| म्हसळा । वार्ताहर ।
जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी रायगड तसेच मतदार नोंदणी अधिकारी 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ व तहसिलदार म्हसळा यांच्या सूचनेनुसार तहसील कार्यालय म्हसळा व आयटीआय कॉलेज वरवठणे म्हसळा यांचे संयुक्त विद्यमाने 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांमध्ये जनजागृती करुन नाव नोंदणी करणेबाबत माहिती देणेसाठी आयटीआय वरवठणे येथे पथक हजर होते. यावेळी तालुक्यातील 20 विद्यार्थ्यांचे 18 वर्षे पूर्ण असल्याने नमुना नं.6 चे फॉर्म भरुन घेणेत आले. तसेच उर्वरित विद्यार्थ्यांना माहिती देवून फॉर्मचे वाटप करण्यात आले. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी नवमतदारांनी फक्त मतदार म्हणून नोंदणी न करता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत भाग घेऊन योग्य उमेदवाराला मतदान केले पाहिजे असे कार्यक्रम दरम्यान सूचित करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शिवराम आडे, केंद्र प्रमुख किशोर मोहिते, तहसील कार्यालयातील प्रतीनिधी अमर ठमके व आयटीआयचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.