| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत नगरपरिषद हद्दीमधील दहीवली गाव परिसरात पिण्याच्या पाण्यापासून अनेक समस्यांना स्थानिक नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्याबद्दल स्थानिक दहीवली गाव परिसर विचारमंचाकडून आवाज उठवला जात आहे. या भागासाठी पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून पालिकेकडून त्या भागाची पाहणी करण्यात आली.
गावातील तरुणांनी दहीवली गाव परिसर विचारमंच हा ग्रुप स्थापन केला असून या भागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात निवेदने देणे, सह्यांची मोहीम आणि नेत्यांच्या लोकप्रतीनिधी यांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्र सुरू आहे. त्याच माध्यमातून शहरातील दहीवली भागातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे या भागात जास्त क्षमता असणारी दुसरी मोठी पाणी साठवण टाकी द्या या मागणीनुसार जुन्या टाकीची पाहणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी केली. यावेळी पालिकेचे पाणीपुरवठा, बांधकाम, स्वच्छता आदी विभागाचे प्रमुख सुदाम म्हसे, सुनिल लाड, दिलीप लाड, राजेश लाड, संकेत भासे, प्रवीण गांगल, दिनेश कडु, गणेश कनोजे, संजय वरगडे, नंदु गुरव, सुनिल जाधव, सुहास वांजळे, विकास चित्ते आदी उपस्थित होते.