अनाधिकृत झोपड्या उध्वस्त

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोली पेण रस्त्यालगत विठ्ठल मंदिराच्या समोर वन विभागाच्या जागेत उभारण्यात आलेल्या अनाधिकृत झोपड्या वनविभागाने सोमवारी उध्वस्त केल्या. स्थानिक रहिवासी राजू गायकवाड यांनी केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेऊन वनक्षेत्रपाल आर. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

खोपोली पेण रस्त्यालगत विठ्ठल मंदिराच्या समोर वन विभागाच्या जागेत काही लोकांनी झोपड्या उभारल्या होत्या. रात्री दारू पिऊन ही लोक आपसात भांडण करत असल्याचा त्रास राजू गायकवाड यांच्यासह अन्य स्थानिकांना होत होता. राजू गायकवाड यांनी 30 एप्रिल रोजी वनविभागाकडे या विरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत अनाधिकृत झोपड्या वनविभागाने सोमवारी उध्वस्त केल्या. वनक्षेत्रपाल आर. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वनपाल बी. जे. दळवी, आर. एम. म्हात्रे, एन. एम. कराडे, बी. एस. सूर्यवंशी, एस. एच. साळुंखे, के. बी. बांगर, एस. एस. बास्टेवाड आदि सहभागी झाले होते. ही जागा संरक्षित वन असून या जागेत दरवर्षी राज्यात प्रसिद्ध असलेली साजगावची मोठी यात्रा भरते.

Exit mobile version