दुचाकीस्वार गंभीर जखमी
| वावोशी | वार्ताहर |
पेण खोपोली मार्गावर पीकअप टेम्पोने मोटारसायकलस्वारास धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याचे नाव गणेश जनार्दन शिर्के आहे. तो बीड जांब्रुंग हद्दीतील वनीचा रहिवासी आहे.
टेंपोचा चालक पेणच्या दिशेने निघाला होता. डोणवत येथे समोरुन येणार्या दुचाकीस्वाराला त्याने जोराची धडक दिली. हा अपघात इतका जोरात झाला की, या अपघातामध्ये गणेश शिर्के यांचे हेल्मेट बाजूला पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन पायाला ही जबर मार लागला आहे. त्यांना अशा अत्यवस्थ अवस्थेत खोपोली येथील जाखोटिया हॉस्पिटल मध्ये तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. हा अपघात ऋतिक मोहन गायकवाड रा. नारंगी यांनी प्रत्यक्षदर्शी पाहिला असून त्यांनी वावोशी पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. तुळशीराम सुतार जयेश कुथे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.