शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळू नका-भाई मोहन गुंड
बीड | प्रतिनिधी |
बीड जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने शेतातील संपूर्ण पिके नेस्तनाबूत झाल्यामुळे संकटात सापडलेला आहे, शेतकऱ्यांच्या शेतात पेरलेल्या पिकांसाठी उधारी ने घेतलेल्या बि- बियाणांचे खतांचे पैसे निघणार नाहीत, शेतकऱ्याने पिकावर घेतलेले शासनाकडून चे पीक कर्जा चे पैसे परत देण्यास तो पूर्णता असमर्थ ठरणार असल्यामुळे याबाबत शासनाने ठोस निर्णय घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर दिलेली मदत बीड जिल्ह्यात देऊन शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत तात्काळ देणे आवश्यक असून शेतकऱ्यांचे शेतीचे पीक कर्ज पूर्ण माफ करुण, गेल्या2 वर्षाचे शेतीचे वीज बिल माफ करणे गरजेचे आहे परंतु शासन हे करण्यास तयार नाही उलट शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपी चे तीन तुकडे करत आहे त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झालेला असून त्यास शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे परंतु शासन कुठले ही ठोस पावले उचलून शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ द्यायला तयार नाही, शेतकऱ्याला अतिवृष्टी मध्ये तात्काळ मदत करण्यात यावी व एफ आर पी चे तीन तुकडे न करता 14 दिवसाच्या आत पूर्ण रक्कम देण्यात यावी, पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी, बीड जिल्हयात देण्यात यावी यासह आदी मागण्यासाठी आपल्या कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहे.
या आंदोलनात-
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट हे. 50 हजार रुपये तात्काळ मदत करा.
एफ आर पी चे तीन तुकडे न करता उसाची एफआरपी एक रक्कमी 14 दिवसाच्या आत द्या
2020 मधील पिक विमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा.
बीड जिल्ह्यातील पाझर तलाव बंधारे पुरग्रस्त भागातील गावांचे पुनर्वसन करा,
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज व शेतीपंपाचे दोन वर्षांचे विज बील माफ करा,
उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांच्या आंदोलनात शेतकऱ्यांनाच फिरणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करून फाशी द्या.
या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी दि 8आक्टोबर रोजी 11ते 3 या वेळेत धरणे आंदोलन बीड जिल्हा अधिकारी कार्यालय समोर करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांच्यासह भाई ऍड नारायण गोले पाटील,भाई ॲड संग्राम तुपे,भाई दत्ता प्रभाळे,भाई अशोक रोडे,भाई अमोल सावंत,भाई गणपत कोळपे,भाई सुमंत उंबरे,भाई नवनाथ जाधव,भाई बाळासाहेब तरकसे,भाई अर्जुन सोनवणे,भाई भीमराव कुटे,भाई मुंजा पांचाळ, समाधान पोळ, वजीर शेख सुदाम चव्हाण, सिद्धेश्वर गायकवाड, संभाजी चव्हाण, राजेभाऊ घोडके, राजेभाऊ जाधव बाबाराजे गायकवाड महेश गायकवाड मंगेश देशमुख आदींनी दिला आहे