| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील खांब येथे दि.26 रोजी परसबाग निर्मितीचे प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न करण्यात आला. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अधिनस्त कृषी विज्ञान केंद्र रोहामार्फत आणि कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असलेल्या कृषी संजीवनी गटातील कृषीदूतांनी परसबाग निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवून परसबागेचे महत्त्व सांगितले.
या प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत परसबाग म्हणजेच घराच्या जवळ असलेली बाग, आपल्या आरोग्याबरोबरच पर्यावरणासाठीही महत्त्वाची ठरते. ताज्या भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पतींचे उत्पादन करून, किचन गार्डन व्यक्तीला स्वयंपाकात नैसर्गिक आणि सेंद्रिय अन्न मिळवण्याची संधी देते. यामुळे अन्नाच्या गुणवत्तेत वाढ होते आणि केमिकल्सपासून दूर राहता येते. तसेच हे आरोग्यदायी आहाराचा एक भाग बनते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. आर्थिकदृष्ट्यादेखील घरच्या बागेतले अन्न उत्पादनामुळे खर्चात बचत होते. पर्यावरणीय दृष्टीने, किचन गार्डन लागवडीमुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते आणि बायोडायवर्सिटी वाढवण्यास हातभार लागतो. या सर्व कारणांमुळे किचन गार्डनची महत्त्वता अधिक वाढली आहे, विशेषतः शहरांमध्ये जिथे लोकांना ताजे अन्न मिळवण्यासाठी पर्यायी स्रोतांची आवश्यकता असल्याची माहिती यावेळी कृषीदूतांकडून देण्यात आली. या प्रात्यक्षिकांसाठी डॉ. कुलकर्णी तसेच कृषी विज्ञान केंद्र रोहाचे डॉ. मनोज तलाठी व डॉ. आरेकर, डॉ. मांजरेकर यांचेही मार्गदर्शन लाभले.