| पाताळगंगा | वार्ताहर |
जांबरुंग येथे परसबाग बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी यावेळी शेकडो महिला वर्गांनी लाभ घेतला. हा कार्यक्रम कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी खालापूर कार्यालया च्या माध्यमातून जांबरुंग येथे करण्यात आले यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली फुलसुंदर तालुका कृषी अधिकारी निंबाळकर, कृषि परिवेक्षक खालापूर नितिन महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या चांगल्या आरोग्यासाठी माझी परसबागयाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण रोजगार हमी योजना, महाडीबीटी यांत्रिकीकरण योजना, पी.एम.एफ. एम.ई , खरीप हंगाम भात पीक विमा योजना, याविषयी कृषी मंजुषा शिंदे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित महिलांना भाजीपाला मिनिकीट बियाणे मोफत वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे समजते.