पॉवर टिलरद्वारे चिखलणीचे प्रात्यक्षिक

। खांब । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील खांब येथे पॉवर टिलरद्वारे चिखलणीचे प्रात्यक्षिक प्रयोग यशस्वीपणे दाखविण्यात आला आहे. कृषी महाविद्यालय, दापोलीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमच्या कृषी संजीवनी गटाने (कृषीदूत) खांब या गावात पॉवर टिलरद्वारे चिखलणीचे प्रात्यक्षिक करून दाखवलेे. सोबतच भातशेतीमध्ये हिरवळीच्या खतांच्या वापरासंबंधी प्रात्यक्षिक दाखविले. गिरीपुष्पाच्या पानांचा हिरवळीचे खत म्हणून वापर केल्यास उत्पन्नात भरघोस वाढ होत असल्याचे मार्गदर्शनही यावेळी शेतकरी वर्गाला केले. तर ग्रामीण भागात गिरीपुष्प, चवळी, मूग, बर्सीम (चारा पीक), ताग, ढैंचा, आदी वनस्पती सहज उपलब्ध होतात. या हिरवळीचे खत म्हणून वापर केल्यास पीकाला नत्र, स्फुरद, पालाश तसेच इतर अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. ‘गिरीपुष्प’ या वनस्पतीचा वापर करून उत्पन्न वाढीसंबंधीचे प्रात्यक्षिक शेतकर्‍यांना दाखविण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version