| खांब | वार्ताहर |
मौजे कळसांबडे येथे शेतकर्यांची सभेसह शेतीविषयक विविध प्रकारचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी सारिका दिघे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, बांबू लागवड योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, यांत्रिकीकरण, पीएम किसान, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना आदी योजनाबद्दल शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन केले.
कृषी सहायक अतुल बाबर यांनी भात पिकावरील विविध कीड व रोग, नियंत्रण खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले तसेच भात पीक प्रात्यक्षिक प्लॉट शेतकर्यांसमवेत भेट देण्यात आली. ई पीक पाहणी कशी करावी याबाबत माहिती सांगितली. तसेच शेतकरी राजेश रमेश मोरे यांनी त्यांचे शेती अनुभव याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीच्या शेवटी सर्व शेतकर्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.