जैन समाजातर्फे नेरळमध्ये निदर्शने

| नेरळ | प्रतिनिधी |

झारखंड राज्यातील जैन धर्माचे प्रवित्र स्थळाला पर्यटनाचा दर्जा देण्यात आला आहे. त्या विरोधात नेरळ जैन संघाकडून दुकाने बंद ठेवून निषेध करण्यात आला आणि निवेदन खा. श्रीरंग बारणे आणि आ. महेंद्र थोरवे यांना देण्यात आले. कर्जत येथे तहसिलदार तसेच नेरळ पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले. या निषेध रॅलीमध्ये जैन संकल संघ नेरळ, जय जिनेद्र ग्रुप नेरळ, अंहीसा मंडळ व अहंम मंडळ तसेच अनिल जैन, संकलेश जैन, ललित जैन, विनोद हिंगड, विनोद जैन, राहुल जैन, धिरज जैन, भरत जैन, संजय जैन, तरंग जैन, मेहुल जैन, ओजस जैन, अमित जैन, दीलीप जैन आदी जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.

Exit mobile version