काळभैरु आरावी संघ प्रथम
| मुरुड | प्रतिनिधी |
हरिहरेश्वर येथे देवघर भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिले संपन्न झाले. हनुमान जन्मोत्सव चे औचित्य साधत, श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील भंडारी युवकांचे दोन दिवसाचे क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन देवघर भंडारी मित्र मंडळ हरिहरेश्वर भंडारी प्रीमियर लीग 2026 चे आयोजन करण्यात आले होते. या पर्वामध्ये एकूण 12 संघाने आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रथम क्रमांक काळभैरु आरावी संघाने पटकावले. कार्यक्रमाचे उद्घाटन कृष्णकांत साखळे तसेच भंडारी समाजाच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व ज्ञाती बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
काळभैरू आरावी संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. आई गावदेवी संघ आदगाव द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. उत्कृष्ट फलंदाज श्रमिक राऊत, उत्कृष्ट गोलंदाज श्रवण लिडकर, मालिकावीर सतीश पाटील यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. उत्कृष्ट समालोचन हरिश दिघीकर व अनुज मोरे या दोघांनी करून कार्यक्रमात आपल्या बहारदार आवाजाने रंगत आणली.
प्रथम आणि द्वितीय पारितोषिक वितरणाकरिता भंडारी समाजाच्या वतीने प्रमुख मान्यवर पांडुरंग तोडणकर, अखंड भंडारी समाज अध्यक्ष रामकृष्ण मांजरेकर, प्रवीण मयेकर, रंजन कोलथरकर, सुकृत कोलथरकर, मंगेश पोलेकर, सागर करदेकर, सुधिर मयेकर, विठोबा (आप्पा) देवकर, सुभाष कोलथरकर, विराट मयेकर यांची उपस्थितीती होती. या पर्वामुळे ग्रामीण भागातील मुलांना क्रिकेटचे एक व्यासपीठ उपलब्ध होऊन भविष्यामध्ये उत्तम क्रिकेटवीर तयार होतील, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.






