मुंबईहून निघाले गुवाहाटीला अन्‌ पोचले बांग्लादेशात; नेमकं काय घडलं?

इंडिगो एअरलाईन्सच एमरजन्सी लँडिंग

। मुंबई । प्रितिनिधी ।

मुंबईहून गुवाहाटीला जाण्यासाठी निघालेले प्रवासी इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात स्वार झाले खरे, पण ते विना पासपोर्ट आणि विना व्हिसा थेट बांगलादेशात पोहोचले. दाट धुक्यामुळे विमानाचं गुवाहाटीला लँडिंग करणं शक्य झालं नाही आणि शनिवारी (दि.13) विमानाचं एमरजन्सी लँडिंग थेट बांगलादेशात करावं लागलं. कडाक्याच्या थंडीमुळे पडलेल्या दाट धुक्याचा मोठा फटका मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बसला आहे.

मुंबई विमानतळावरुन इंडिगो एअरलाईन्सच्या विमानानं गुवाहाटीला जाण्यासाठी उड्डाण भरलं. गुवाहाटीला विमान लँड करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण, गुवाहाटी विमानतळावर दाट धुक्यामुळे दृश्यमानता जवळपास शून्य झाली होती. यामुळे विमान आसाममधील गुवाहाटी विमानतळावर उतरू शकलं नाही. विमान नंतर आसाम शहरापासून 400 किलोमीटरहून दूर असलेल्या ढाकाकडे वळवण्यात आलं. इंडिगो एअरलाईन्सच्या या विमानाचं बांगलादेशची राजधानी ढाका येथे एमरजन्सी लँडिंग करावं लागलं.

Exit mobile version