। रसायनी । वार्ताहर ।
वारकर्यांच्या मुखातून होणारा ग्यानबा तुकाराम आणि विठू नामाचा गजर टाळ मृदुंगाच्या गजरात खांद्यावर भगव्या पताका घेऊन साजगाव खोपोली येथील धाकटीपंढरी म्हणून प्रसिद्ध असणार्या साजगाव येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात दर्शनासाठी भाताण गावातून कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने दिंडीचे प्रस्थान झाले.
गेली आठ वर्षाची परंपरा कायम ठेवत कीर्तनकार, शिवचरित्रकार संतोष महाराज सते यांच्या सहकार्याने दरवर्षी या दिंडीचे आयोजन केले जाते. यावर्षी मात्र विठुरायाचे दर्शन व्हावे म्हणून सर्व वारकरी महिलावर्ग डोक्यावर तुळस घेऊन महिलावर्ग लहान मुले पताका खांद्यावर घेऊन टाळ-मृदुंग विठ्ठलाच्या गजरात ही दिंडी भाताण येथून प्रस्थान झाली. विभागातील वारकरी संप्रदायातील महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येने सदर दिंडीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विठुनामाने परिसर दुमदुमून गेला.