| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायातील नागरिकांकडून आळंदी येथे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी शनिवारी निघाल्यानंतर दुपारी रसायनी पोलिस ठाण्याच्या आवारात पोहोचली. यावेळी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वनाथ बप्पाजी खेडकर यांनी दर्शन घेऊन दिंडीचे स्वागत केले.
यावेळी पिआय खेडकर यांनी दिंडीतील वारकरी संप्रदायासह नागरिकांना पायी आळंदीकडे जात असताना सुरक्षित अंतर ठेवून चालावे, रस्त्याबाजूने चालताना काळजी घ्यावी असे सांगून पाताळगंगा येथील चावणे, कासप, जांभिवली, कराडे बुद्रुक व आसपासच्या गावातील निघालेल्या पायी दिंडीचे स्वागत केले.
यावेळी वारकरी संप्रदायाच्यावतीनेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वनाथ बप्पाजी खेडकर यांचे श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी रसायनी पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या पायी दिंडीत पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी भागातील वारक-यांसह लहानथोर सामील झाले होते. महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते. यानंतर टाळ मृदुंगाच्या आवाजात हरिनामाच्या गजरात हि पायी दिंडी आळंदीकडे रवाना झाली.