पंधरा वर्षे शिक्षक वेतनापासून वंचित

। कोर्लई । वार्ताहर ।
मागील 15 वर्षांपासून वेतनापासून वंचित असणार्‍या कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदावरील शिक्षकांच्या पदांना तात्काळ मान्यता देऊन वेतन सुरू करण्याबाबत आ.बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक आमदारांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मंत्रालयात भेट घेऊन, शिक्षकांच्या पदाला तात्काळ मान्यता देऊन वेतन सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्‍वासन शिक्षणमंत्र्यांनी आमदारांच्या शिष्टमंडळाला दिले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या वेतनाबाबत निर्णय घेण्यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना मेलद्वारे बाळाराम पाटील यांनी आधीच निवेदन निवेदन होते. त्यानुसार मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांचे विविध प्रश्‍न व प्रश्‍नांचे निराकरण करण्यासंदर्भात शिक्षक आमदार व शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या हिताबाबत योग्य निर्णय घेण्यात आले. यावेळी आ.बाळाराम पाटील, आ.सुधीर तांबे, आ.अभिजित वंजारी, आ.जयंत आसगावकर, आ.विक्रम काळे, आ.किरण सरनाईक, अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, संचालक एम.डी.सिंग, अप्पर मुख्य सचिव एम.डी.जगताप आदी उपस्थित होते.

Exit mobile version